विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न : डॉ.सचिन पानझडे
भुसावळ (10 सप्टेंबर 2024) : वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध होते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न आमचा प्रयत्न असल्याचे गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे म्हणाले. शहरातील के.नारखेडे विद्यालयात भुसावळ तालुका शिक्षण विभाग व समग्र शिक्षा साधन केंद्र, भुसावळतर्फे तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी डॉ.पानझडे बोलत होते.
विविधांगी विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन
प्रदर्शनामध्ये विविध क्षेत्रातील विविधांगी विषयावरील ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले. के.नारखेडे विद्यालयातील विविध हस्तलिखितांचा समावेश सुद्धा या प्रदर्शनात करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे होते. किशोर वायकोळे, तुषार प्रधान, बी.डी.धाडी, मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, उपमुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक संगीता अडकमोल, एस.एल.राणे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ग्रंथपाल विनोद भंगाळे यांचे सहकार्य लाभले.

