खोखो स्पर्धेत भुसावळातील स्वामीनारायण गुरुकुलचा संघ जिल्ह्यासाठी पात्र


भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : 17 वर्षे वयोगटाखालील भुसावळ तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुलचा संघ विजयी झाला. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. नुकत्याच तालुकास्तरावर झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो स्पर्धेत विजयी होऊन साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयाच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला.

संघाला क्रीडा शिक्षक दीपक बावस्कर यांचे तसेच मुख्याध्यापक प्रणिता चौधरी, उज्वला धांडे आणि मनोज भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे तसेच क्रीड ाशिक्षक बावस्कर यांचे संस्थेचे प्रमुख प.पू.ऋषिप्रसाद स्वामी, गोपाळ भगत आणि संस्थेच्या पदाधिकारी यांनी सत्कार करीत कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !