भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान पद्धती’ विषयावर कार्यशाळा


भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : भुसावळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय ‘भारतीय ज्ञान पद्धती’ या विषयावर सामाजिक शास्त्रमंडळ आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली

यांची कार्यशाळेला उपस्थिती
उद्घाटन सकाळी नऊ वाजता महाविद्यालयातील वाचनकक्षात झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील होते. उद्घाटन शेंदुर्णीच्या ए.आर बी.गरुड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.प्रशांत देशमुख यांच्याहस्ते झाले. कला शाखेचे समन्वयक प्रा.दीपक पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी केले. याप्रसंगी समन्वयक डॉ.ममताबेन पाटील, डॉ.सचिन राजपूत उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.एकता बजाज व प्रा.डॉ.सपना जंगले यांनी केले. प्रथम सत्रात प्राचीन भारतीय शिक्षण व विद्यापीठे या विषयावर प्रा.डॉ.प्रशांत देशमुख यांनी सादरीकरण केले. दुसर्‍या सत्रात प्राचीन कला व स्थापत्य या विषयावर जी.जी.खडसे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.पंकज कुमार प्रेमसागर यांनी सादरीकरण करून माहिती दिली.

तिसर्‍या सत्रात प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र या विषयावर मनोज कुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एस.टी.धूम, प्रा.के.पी.पाटील, प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, प्रा.श्रीपाद वाणी, प्रा.डॉ.सचिन राजपूत, प्रा.भूषण चौधरी, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.खिलेश पाटील, प्रा.स्वाती शेळके, प्रा.पूनम महाजन, प्रा.आकाश तायडे, प्रा.श्रृती नेवे, प्रा.सोनिया टेकवाणी, प्रा.नंदिनी दायमा, प्रा.प्रियंका खडसे यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !