भातखंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाचा अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू


Upasarpanch of Bhatkhande Gram Panchayat dies after wall collapses on him पाचोरा (11 सप्टेंबर 2024) : भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा बांधकाम कामगाराचा अंगावर भिंत कोसळताच अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विलास रतीलाल कुमावत (39, रा.भातखंडे खुर्द, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.

अंगावर कोसळली भिात
कुमावत हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच होत. तसेच ते बांधकाम गवंडी काम करून उदरनिर्वाह करीत होते. विलास कुमावत यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. विलास कुमावत हे रविवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी पाचोरा शहरातील भडगाव रोडवर बांधकामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसळली. या अपघातात विलास कुमावत हे गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्युशी झुंज देत असतानाच विलास कुमावत यांचा उपचारादरम्यान मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !