परसाडे बुद्रुक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अपात्र


यावल (14 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मीना राजू तडवी यांना अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र घोषित केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

तक्रारीअंती जिल्हाधिकार्‍यांची कारवाई
गत सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शब्बीर कान्हा तडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे रहिवास करत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी अपात्रतेचा आदेश काढला. तो शुक्रवारी प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी थेट लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र ठरवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


कॉपी करू नका.