भुसावळात पर्यावरण संवर्धनासाठी केले वृक्ष वाटप
भुसावळ भाजपा सरचिटणीस श्रेयय इंगळे यांचा उपक्रम
भुसावळ (19 सप्टेंबर 2024) : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी व झाडांची असलेली आवश्यकता पाहता भुसावळातील भाजपाचे सरचिटणीस श्रेयस शेखर इंगळे यांनी गणेशोत्सवात प्रभाग क्रमांक सहामधील सर्वच गणेश मंडळाना आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून वृक्षांचे वाटप केले. यावेळी मंडळांनी केवळ वृक्षारोपण न करता हे वृक्ष जगण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रेयस इंगळे यांनी केले.