सिंगनूरला विद्युत खांबावर वीज कोसळताच टीव्हीसह पंखे जळाले
सिंगनूर, ता.रावेर (23 सप्टेंबर 2024) : शुक्रवारी दुपारी तीन वाजेदरम्यान सिंगनूर येथील इंदिरानगर भागात जोरदार विजांच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली. यावेळी गणेश रघुनाथ पाटील यांच्या घराजवळ असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर वीज पडली मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.
वीज कोसळताच आजूबाजूच्या घरातील रहिवाशांचे टीव्ही, पंखे, सेटअप बॉक्स, जळाले. त्वरित पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महावितरण कंपनीच्या डीपीचे मोठे नुकसान झाले.

