भुसावल मंडळात ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिम


भुसावळ (23 सप्टेंबर 2024) : भुसावळ मंडळाने ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेंतर्गत डीआरएम ईती पाण्डेय यांनी भुसावळ स्काउट गाईड मैदानात वृक्षारोपण केले.

या विशेष कार्यक्रमात अपर मंडल रेल प्रबंधक (तंत्रज्ञान) एम.के.मीना, सर्व शाखा अधिकारी आणि स्काउट गाईडचे सदस्य उपस्थित होते. या मोहिमेचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. या उपक्रमाद्वारे भुसावल मंडलातील सर्व स्थानक क्षेत्रांमध्ये, डेपो, वर्कशॉप, भुसावळ मंडळ रेल्वे हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !