फैजपूर नगरपालिकेला लाभले पूर्णवेळ मुख्यधिकारी
फैजपूर (23 सप्टेंबर 2024) : नगरपालिकेत मुख्याधिकारी पद गेल्या दोन वर्षांपासून रीक्त असल्याने व प्रभारीपद असल्याने शहरवासीयांना मूलभूत सेवा-सुविधा मिळण्यास दिरंगाई होत होती. आमदार शिरीष चौधरी यांनी उशिरा का होईना आंदोलनात्मक धोरण घेतल्यानंतर राज्य शासनाने ऐतिहासिक फैजपूर नगरीला श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथील मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे पत्र नगरपालिका प्रशासनास प्राप्त झाले आहे. सोमवारी मुख्याधिकारी जाधव हे आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

