थोर विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्यातील गुण आत्मसात करावेत

भुसावळात स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कारप्रसंगी मान्यवरांचा सूर


भुसावळ (23 सप्टेंबर 2024) : विविध क्षेत्रातील मान्यवर विभूतींनी आपज आपल्या देशाला विविध क्षेत्रात उच्च स्थानी नेले आहे. त्यांच्याबद्दल आपण नेहमीच आदरभाव जपला पाहिजे व त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्यातील अंगभूत गुणांचा अवलंब करायला शिकायला हवे, असा सूर येथे मान्यवरांनी व्यक्त केला. के.नारखेडे विद्यालय व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, थोर साहित्यिक स्व.बाबासाहेब कौती नारखेडे यांच्या 44 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व, लेखन, सुगम संगीत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी दुपारी अडीच वाजता शहरातील प्रभाकर हॉलमध्ये झाला

यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मकरंद एन.नारखेडे होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुण्याचे विज्ञान विभाग प्रमुख डॉ.दिलीप देशमुख प्रमुख अतिथी होते. मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच बाबासाहेब के.नारखेडे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनाही गौरविण्यात आले. विद्यालयाचे नियतकालिक पालवीच्या ‘पर्यटन विशेषांकाचे’ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

थोर विभूतींच्या आठवणींना उजाळा
प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात ‘पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यापासून तर रघुनाथ माशेलकर, ए.पी.जे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर अशा विज्ञान क्षेत्रातील थोर संशोधकांच्या व वैज्ञानिकांच्या त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतून जे अविस्मरणीय अनुभव आले त्या आठवणींना उजाळा दिला. डॉ.मकरंद एन नारखेडे यांनी मनोगतात भुसावळ व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक हे ‘बाबासाहेब के नारखेडे स्मृती स्पर्धांच्या’ निमित्ताने आमच्या विद्यालयात येतात त्याबद्दल आम्हाला त्यांचे विशेष आभार मानायला हवे असे सांगून स्पर्धेसाठी डॉ.दिलीप देशमुख यांच्यासारखे विद्वान विज्ञाननिष्ठ कर्तृत्ववान व्यक्तींचे विचार ऐकायला मिळाले हे खरोखरीच आमच्या या उपक्रमाचे सार्थक असल्याचे ते म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑ.जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, भाग्येश नारखेडे, नारखेडे कुटुंबीय संस्थेचे हितचिंतक व स्नेही तसेच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सर्व विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन के.एस.राणे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी केले. संस्थेचे शालेय समितीचे चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन एस.डी.वासकर यांनी केले. एन.जे.पाटील यांनी मान्यवर पाहुण्यांचा परिचय दिला. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन एन.एस.पाटील, एस.पी.महाजन, एस.टी.चौधरी यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !