शेतकरी भूमिपुत्र, नागरिकांच्या कल्याणासाठी शेळगाव बॅरेजचे प्रथमच जलपूजन : डॉ.कुंदन फेगडे

यावल (25 सप्टेंबर 2024) : जळगावसह भुसावळ, यावल, चोपडा, तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या शेळगाव बॅरेजचे शेतकर्यांसह जलपूजन केल्याची भावना आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी व्यक्त केली. रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बुधवारी डॉ.फेगडे यांनी शेळगावच्या जलसाठ्याचे पूजन केले.
यावल, रावेर, चोपड्यास फायदा
शेळगाव बॅरेज सिंचन योजनेंतर्गत यावल व चोपडा तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, मेहेलखेडी, कोरपावली, दहिगाव, वाघोदा, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराडे, शिरसाड भागातील चार हजार 699.13 हेक्टर जमीन तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल, सांगवी बु.॥, चितोड, अट्रावल, सातोद, कोळवद या सहा गावांमधील चार हजार 428.9 हेक्टर जमीन मिळून एकूण नऊ हजार 128 हेक्टर जमीन लाभान्वित होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2018-19 बेंचमार्किंग रिपोर्टनुसार शेतकर्यांना सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे पाणलोटांची भूजल पातळीत वाढ होणे व यावल रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन केल्यास भूजल पातळीत वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी माजी खासदार तथा आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्यासह माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, लता सोनवणे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.
शास्त्रोक्त जलपूजन
रावेर विधानसभा मतदारसंघातील सहा गावे हे सिंचन व औद्योगिक वापरासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकरी भूमिपुत्र व नागरिकांच्या सर्वोतोपरी कल्याणासाठी, कायापालटासाठी, जलदेवतेची कृपा राहण्यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघातील आणि यावल येथील समाजसेवक तसा डॉ.कुंदन फेगडे यांनी प्रथमच शेळगाव बॅरेज प्रकल्पातील जलपूजन शास्त्र पद्धतीने केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी गोपाळसिंग पाटील, उखडू पाटील, हेमराज फेगडे, योगेश चौधरी, अनुराधा परदेशी, रोहिदास सपकाळे, गोपाळ कोळी, अनिल सपकाळे, मोहन सपकाळे, सतीश कोळी, गजानन कोळी, संजय पाटील, नाना कोळी, पुष्पक कोळी, गणेश कोळी, अजय कोळी, रितेश बारी, निलेश सपकाळे, अक्षय पवार, राहुल झांबरे, उज्वल कानडे, कोमल इंगळे, शुभम देशमुख, मनोज बारीसह मोठ्या संख्येने युवक, नागरिक, सहकारी उपस्थित होते.
