नाशिकसह धुळे, नंदुरबारला ऑरेंज अलर्ट : जळगावसाठी हवामान विभागाने दिला ‘हा’ ईशारा
मुंबई (27 सप्टेंबर 2024) : परतीच्या पावसाने राज्यभरात शेतकर्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला असून मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शुक्रवार 27 रोजीदेखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार
नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नगरसह जळगावमध्ये हलका ते मध्यम, पुणे, सातार्यात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.


परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण
दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर वार्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून हवेच्या कमी दाबाचा द्रोणिय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड ते बांगलादेशपर्यंत पसरला आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
नाशिक, पालघर, रत्नागिरी, वर्धा जिल्ह्यात गुरुवारी देखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पिण्याचा प्रश्न प्रश्न मिटला आहे. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बर्याच जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
