भुसावळातील स्व.राजीव गांधी वाचनालयात पद्मश्री रंगनाथन यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


भुसावळ (27 सप्टेंबर 2024)   : शहरातील स्व.राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री शि.रंगनाथन यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष मो.मुनव्वर खान व रेल्वेचे निवृत्त तिकीट तपासणीस राजेंद्र महाजन यांनी प्रतिमेचे पूजन केले.

मुनव्वर खान म्हणाले की, ग्रंथालयामुळे लोकांना ग्रंथ अभ्यासाची आवड निर्माण होईल व वाचनाने मनुष्य समृद्ध होत असल्याने वाचन काळाची गरज आहे. संचालिका सायरा बानो, काँग्रेसचे शहराध्यक्ष सलीम गवळी, जे.बी.कोटेचा, यास्मीन बानो, सुमन विलास सावडे, शकील शेख, शिला ईदर परदेशी, आरीज शेख, आलीशा शे.सुधाकर, कलकंर दीपक जैन व अनेक पदाधिकारी व वाचक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !