पालजवळ अपघात : भरधाव आयशरच्या धडकेने एक पादचारी ठार


रावेर (28 सप्टेंबर 2024) : भरधाव आयशरने बैलं घेऊन जाणार्‍या पादचार्‍याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचार्‍याचा मृत्यू झाला तर चार बैले दगावली. हा अपघात पाल-रावेर रस्त्यावर पाल गावानजीक घडला. वाहन चालकाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आयशर चालक पसार
शेख फिरोज शेख गंभीर (रा.बहादरपूर, ह.मु.पाल) शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पालहून रावेर येथील शुक्रवारच्या बाजारात बैल विक्री साठी घेऊन येत असतांना हबीब तडवी यांच्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने येणारी आयशर (क्र.एम.एच.19 झेड 5285) ने जोरदार धडक दिल्यामुळे पादचारी शेख फिरोज शेख गंभीर (32) हा ठार झाला तर चार बैलांचा मृत्यू झाला. याबाबत शेख नजीम शेख रफीक यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक पिंटू पूर्ण नाव माहित नाही हा पसार झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !