स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे विभागात नुक्कड नाटक


भुसावळ (29 सप्टेंबर 2024) : मध्य रेल्वेतर्फे स्वच्छता ही सेवा अभियानाच्या अंतर्गत ‘नुक्कड’ नाटकाचे आयोजन विभागात करण्यात आले होते. या नाटिकेतून स्वच्छतेचे महत्व प्रवाशांना पटवून देण्यात आले. भुसावळसह विविध रेल्वे स्थानकांवर हे नुक्कड नाटक आयोजीत करण्यात आले. शुक्रवारी डीआरएम ईती पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ स्थानकावर नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले. स्काऊट गाइड आणि रेल्वे शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नुक्कड नाटक सादर केले.

विभागात नुक्कड नाटकाचे आयोजन
मलकापूर स्थानकावर श्रीमती कावेरी देवी केदारमल अग्रवाल कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नुक्कड नाटक सादर केले. चाळीसगाव स्थानकावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. देवळाली स्थानकावर कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नुक्कड नाटक सादर केले. मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर स्थानकावर सरस्वती शिशू मंदिर हायस्कूल विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नाटक सादर केले. मूर्तिजापूर स्थानकावर लोटस इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नुक्कड नाटक ,सादर केले तर शेगाव स्थानकावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघाद्वारा स्वच्छतेवर आधारित नुक्कड नाटक सादर केले.

अकोला स्थानकावर रेल यात्री एकता मजदूर संघातर्फे (महिला टीम) स्वच्छतेवर आधारित नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये स्वच्छ रेल सुंदर भारत याबद्दल जनजागृती करण्यात आली. रेल्वे स्थानक व परिसराची स्वच्छता राखणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये आणि रेल्वेच्या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभाग घेण्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि स्वच्छता मोहिमेसाठी रेल्वेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नुक्कड नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि स्वच्छ परिसर राखण्याचे महत्व प्रभावीपणे मांडले. रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने घेतल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती प्रवाशांना देण्यात आली. यामध्ये रेल्वे स्थानकावरील स्वच्छता मोहिम, कचरा व्यवस्थापन, आणि स्वच्छ रेल्वे, सुरक्षित प्रवास यावर भर देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या परिसरातील स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !