भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात स्वच्छता अभियानावर व्याख्यान
भुसावळ (29 सप्टेंबर 2024) : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा 2024 स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या कार्यक्रमांतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाविद्यालय राबवण्यात आले.
106 स्वयंसेवकांची उपस्थिती
भालोद महाविद्यालयाचे राज्यशास्त्र प्रमुख डॉ.सुनील नेवे स्वच्छतेबद्दल विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे 106 स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेकरिता कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आर.बी ढाके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.राजेंद्र भोळे, प्रा.डॉ.अनिल सावळे व सर्व स्वयंसेवकानी परिश्रम घेतल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवितात.

