भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात प्रकल्प अहवालावर कार्यशाळा
भुसावळ (29 सप्टेंबर 2024) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र व वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रोजेक्ट रिपोर्ट या विषयावर पदवी व पद्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठस्तरीय कार्यशाळा झाली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, प्रमुख वक्त्या क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रा.डॉ.पवित्रा पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.ममताबेन पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र समन्वयक व कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ.रश्मी शर्मा उपस्थित होत्या.

प्रा.डॉ.पवित्रा पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रकल्प अहवाल कसा तयार करावा या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रकल्प अहवालातील आवश्यक बाबी, प्रकरणे, उद्दिष्ट्ये, माहिती संकलन व प्रकल्प अहवालाची मांडणी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ.रश्मी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे प्रकार व प्रकल्प विषय कसा निवडावा या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तिसर्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांचे आठ संघ तयार करून प्रकल्प अहवाल कसा तयार करावा या विषयावर प्रात्यक्षिक करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एस.व्ही.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक प्रा.डॉ.रश्मी शर्मा तर सूत्रसंचालन प्रा.सोनिया टेकवाणी व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.एकता बजाज यांनी दिला. आभार प्रा.डॉ.ममताबेन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्रा.डॉ.के.पी.पाटील, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा. खिलेश पाटील, प्रा.भूषण चौधरी, प्रा.डॉ.सपना जंगले, प्रा.आकाश तायडे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.एकता बजाज, प्रा.श्रृती नेवे, प्रा.प्रियंका खडसे, प्रा.नंदिनी दायमा, त्रिविक्रम वारके यांचे सहकार्य लाभले.
