भुसावळातील लोक न्यायालयात 25 प्रकरणे निघाली निकाली

तडजोडीची 42 लाख 11 हजार 700 रुपयांची रक्कम वसूल


भुसावळ (29 सप्टेंबर 2024)  : न्यायालयात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात 25 खटले निकाली निघाले. 42 लाख 11 हजार 700 रुपयांची तडजोडीची रक्कम वसूल करण्यात आली. यावल न्यायलयात शनिवारी आयोजीत केलेल्या लोक न्यायालयात 93 प्रकरणात 19 प्रकरणे निकाली निघाली व दाखलपूर्व प्रकरणात दोन हजार 862 पैकी सहा प्रकरणे निकाली निघाली.

अनुक्रमे 39 लाख 65 हजार व 2 लाख 46 हजार 800 असे दोन्ही मिळून 42 लाख 11 हजार 700 रुपये इतकी रक्कम वसुल झाली. लोकअदालतीत चार पॅनल होते. पहिल्या पॅनलवर न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा प्राधीकरण अध्यक्ष एस.टी.सूर व पंच सदस्य म्हणून अ‍ॅड.जास्वंदी भंडारी होत्या. दुसर्‍या पॅनलवर न्या.आर.एस.पाजनकर, पंच सदस्य अ‍ॅड.शरद तायडे होते. तिसर्‍या पॅनलवर न्याय.एस.बी.तिवारी व पंच सदस्य अ‍ॅड.सुविधा मोरे होत्या. चौथा पॅनलवर न्या.एस.व्ही.जंगमस्वामी या होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !