किनगावला विवाहितेची आत्महत्या : एकाविरोधात गुन्हा
यावल (30 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील किनगाव नीलिमा संजय कोळी (28) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी रुपेश राजेंद्र धनगर (किनगाव बुद्रुक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रुपशने गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने तिच्याकडे वाईट भावनेने पाहून तू माझ्याशी प्रेम संबंध ठेव, असा तगाला लावला होता. वारंवार माझ्याशी प्रेम संबंध ठेव नाहीतर मी तुझ्या नवर्याला आणि मुलांना मारून टाकेल, अशी धमकी देखील तो देत होता. या तरुणाच्या त्रासाला कंटाळूनविवाहितेने शनिवारी आपल्या राहत्या घरात स्वयंपाक खोलीत गळफास घेतला.
किनगावातील संशयीताविरोधात गुन्हा
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी मयत विवाहितेचे पती संजय भागवत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेला आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

