किन्ही एमआयडीसीतून चोरट्यांनी 23 हजारांचे साहित्य लांबवले


भुसावळ (30 सप्टेंबर 2024) : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसीतील एका कंपनीतून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोटून इन्व्हर्टरसह शेगडी मिळून 23 हजारांचे साहित्य लांबवले. चोरीची घटना 11 ते 21 सप्टेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुलूप तोडून लांबवले साहित्य
दीपक उत्तमचंद अग्रवाल (39, सतलज अपार्टमेंट, गडकरी नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, किन्ही एमआयडीसीतील प्लॉट नंबर सी.11 चे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत 12 हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर व पाच हजार रुपये किंमतीची शेगडी, तीन हजार रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य तसेच तीन हजार रुपये किंमतीचे शिलाई मशीन व पत्र्याचे कुलर मिळून 23 हजरांचे साहित्य लांबवले. चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभान तडवी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !