रावेरातील होंडा शोरुममध्ये 25 हजारांची चोरी


रावेर (30 सप्टेंबर 2024) : शहरातील सावदा रोडलगत असलेल्या राम होंडा शोरुममागील बाजूची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपयांवर डल्ला मारला. रावेर शहरातील सावदा रोड लगत असलेल्या राम होंडा शोरुमची मागील बाजूची स्लाईडिंगची खिडकी उघडून चोरट्याने आत प्रवेश केला.

रकॅश काऊंटरच्या ड्राव्हरमधील 25 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. याबाबत शोरुम संचालक अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !