भावी पिढीच्या संस्कारासाठी शिक्षक खरे आधारस्तंभ : डॉ. कुंदन फेगडे
Teachers are the real pillar for the culture of the future generation : Dr. Kundan Fegde फैजपूर (30 सप्टेंबर 2024) : शिक्षक हे कोणाचेही गुलाम नाहीत तर ते युवा पिढीवर संस्कार घडवणारे आणि भारताची भावी पिढी घडवणारे आधारस्तंभ आहेत. समाजात शिक्षकांचा मान सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले. आश्रय फाउंडेशन, यावलच्या वतीने आज फैजपूर येथे रावेर-यावल तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची विचार मंचावर उपस्थिती
फैजपूरच्या खंडोबावाडी देवस्थान परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनदास महाराज, पी.एस.सोनवणे यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी (न्हावी), मुख्याध्यापक दिलीप पाटील (अभोडा) आणि जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जितेंद्र पाटील (मोरगाव) आणि दीपक चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास डॉ.पराग पाटील, डॉ.भरत महाजन, डॉ.सोहन महाजन, डॉ.विलास पाटील, संदीप भारंबे, कन्हैया चौधरी, शुभम तांबट, राम शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचार्यानाहा सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीशा कोळी यांनी केले. अश्विनी कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास यावल रावेर तालुक्यातून शेकडो मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आश्रय फाउंडेशनच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.
