राज्यस्तरीय आंतर शालेय बँडपथक स्पर्धेसाठी सेंट अलायसेस शाळेतील पथकाची निवड
भुसावळ (30 सप्टेंबर 2024) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याद्वारे आयोजित आंतर शालेय माध्यमिक स्तरीय बॅण्ड पथक स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातून भुसावळ येथील सेंट अलायसेस शाळेतील बॅण्ड पथकाची निवड झाली. हे बँड पथक पुणे येथे रवाना झाले.
जळगाव जिल्ह्यातून एकमेव भुसावळातील शाळेची निवड
स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे जिल्हे सहभागी होत आहेत. जळगाव जिल्ह्यातून केवळ भुसावळ येथील सेंट अलायसेस शाळेचा बॅण्ड पथकाची निवड करण्यात आली. या पथकात 28 मुलींचा सहभाग आहे. या निवडीबद्दल शाळेचे चेअरमन सिस्टर टेलमा, मुख्याध्यापिका सिस्टर सेलमा, सुपरवायझर सिस्टर शोभना, बॅण्ड शिक्षक अॅलेस्टर, आणि मेघशाम शिंदे, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.

