धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये
यावल तहसील कार्यालयात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी
यावल (01 ऑक्टोबर 2024) : यावल तहसील कार्यालयामध्ये सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीच्या यावल शाखेकडून निवेदन देण्यात आले व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणी करण्यात आली. आदिवासी पेसा क्षेत्रातील नोकर भरती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यांची निवेदन देताना उपस्थिती
यावल तहसील कार्यालयामध्ये सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा, यावलचे अजहर तडवी, काँग्रेस अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष बशीर परमान तडवी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार मूळ आदिवासींची 12 हजार 500 पदे जे सध्या रिक्त आहे ती पद भरती तातडीने करावी यासह विविध मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या. हे निवेदन नायब तहसीलदार मनोज खारे यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी जवानसिंग पावरा, शरीफ तडवी, सुभाष बारेला, बिसा तडवी, लुकमान तडवी आदींची उपस्थिती होती.