जळगाव जिल्हास्तरीय भूलाबाई महोत्सवात भुसावळ तालुक्याने उमटवली मोहोर
खुल्या ग्रामीण गटात आनंदी ग्रुप संघ प्रथम तर मोठ्या गटात जि.प.शाळा टाकळीचा संघ द्वितीय
भुसावळ (01 ऑक्टोबर 2024) : जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रविवारी भूलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कान्हदेशातील भूलाबाईचे महत्व जाणून घेण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील 50 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ग्रामीणमधून खुल्या ग्रामीण गटात आनंदी ग्रुप, भुसावळचा संघ प्रथम तर मोठ्या गटात जि.प.शाळा टाकळीचा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाने यापूर्वी भुसावळातील संतोषी माता सभागृहात शुक्रवारी झालेल्या महोत्सवात यशस्वी सहभाग नोंदवत पारितोषिक पटकावले होते व भुसावळात आलेल्या अनुभवामुळे हे यश मिळवता आल्याची भावना विजेत्या संघांनी व्यक्त करीत आयोजक आमदार संजय सावकारे यांचे आभार मानले.
भुसावळ तालुक्याचा वाढला गौरव
केशवस्मृती प्रतिष्ठान व भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील संतोषी माता सभागृहात आमदार संजय सावकारे यांच्या सहकार्यातून भूलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात वरील विजेत्या संघांनी यशस्वी सहभाग नोंदवत पारितोषिक मिळवल्यानंतर त्यांना जळगाव जिल्हा स्तरावर झालेल्या महोत्सवात सहभागी होता आले व विशेष म्हणजे ग्रामीणमधून खुल्या ग्रामीण गटात आनंदी ग्रुप, भुसावळचा संघ प्रथम तर मोठ्या गटात जि.प.शाळा टाकळीचा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
समाजोपयोगी संदेशाची केली पेरणी
विजेत्या संघाच्या पदाधिकार्यांनी जळगावातील महोत्सवात सामाजिक संदेशाची पेरणी केली. महिलांवर अत्याचार, स्त्री सक्षमीकरण, मोबाईलमधील शैक्षणिक क्रांतीबाबत भूलाबाईच्या गाण्यातून प्रबोधन करण्यात आले.
भुसावळात संधी मिळाल्यानेच मिळाले यश
भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाने शुक्रवारी घेतलेल्या भूलाबाई महोत्सवात कला गुण सादरीकरणाची संधी मिळाली तसेच वेळोवेळी मंडळातर्फे होणार्या कार्यक्रमात संधी मिळाल्याने स्टेज डेअरींग वाढले व जळगावातील कार्यक्रमात सहभाग नोंदवता आल्यानेच बक्षीस मिळाले, अशी भावना विजेत्या संघांनी व्यक्त करीत विविध उपक्रमासाठी सहकार्य करणारे आमदार संजय सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांचे मनस्वी आभार मानले.