भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : तिघे संशयीत शहर पोलिसांच्या जाळ्यात
Terror at sword point in Bhusawal : Three suspects in city police net भुसावळ (02 ऑक्टोबर 2024) : शहर पोलिसांनी तलवार बाळगून दहशत निर्माण करणार्या तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार, 29 सप्टेंबर रोजी रात्री 11.40 वाजता करण्यात आली. अटकेतील संशयीतांमध्ये दोन आरोपींसह एका अल्पवयीनाचा समावेश आहे. सोमवारी पहाटे भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहरातील रेल्वे शाळेच्या परिसरात संशयित आरोपी दीपक रमेश म्यांद्रे (40, कवाडे नगर, भुसावळ), पंकज रेवाराम कहार (19, रेल्वे नॉर्थ कॉलनी, भुसावळ) व एक अल्पवयीन संशयीत दुचाकीवर हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली.

पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी रविवारी रात्री साडेअकरा वाजता ताब्यात घेत त्यांच्याकडील 210 रुपये किंमतीची स्टीलची लोखंडी तलवार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत. दरम्यान, दोघा संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची सबजेलला रवानगी करण्यात आली.
