सामंजस्य कराराचे उल्लंघण : मुक्ताईनगरातील क्रीडा संकुलात रंगतोय गरबा दांडिया

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी पदाधिकार्‍यांची माहिती


मुक्ताईनगर (05 ऑक्टोबर 2024)  : मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या मालकीच्या कोथळी ग्रामपंचायत हद्दीतील क्रीडांगणावर धार्मिक व राजकीय कार्यक्रमांच्या आयोजनाला मनाई असताना देखील येथे गरबा-दांडिया सुरू असल्याने ही बाब सामंजस्य कराराच्या विपरीत असल्याची माहिती मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला सचिव डॉ.सी.एस.चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सदस्य पुरुषोत्तम महाजन, चंद्रशेखर बडे, आर.पी.बर्‍हाटे, महेश पाटील, रमेश खाचणे, प्राचार्य एच.ए.महाजन, मुख्याध्यापक नितीन भोंबे, जे.जे.पाटील, मोतीलाल जोगी, सुजीत पाटील, विकास चौधरी, प्रा.ए.पी.पाटील उपस्थित होते.

क्रीडा संकुलाच्या जागेवर रंगतोय गरबा
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखा असून त्यासाठी कोथळी हद्दीत मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या मालकी हक्काचे क्रीडा संकुल आहे. क्रीडा संकुलासाठी सामंजस्य करार शासन व संस्थेच्या दरम्यान करण्यात आला आहे. करारानुसार कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय कार्यक्रमासाठी हे क्रीडा संकुल देता येणार नाही. असे असताना सुद्धा या ठिकाणी दांडिया-गरबाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. क्रीडा संकुलाची मालकी हक्क हा संस्थेकडे आहे. या क्रीडा संकुलासाठी अंतर्गत विविध ठिकाणी होणार्‍या क्रीडा स्पर्धा तालुक्यातील क्रीडा स्पर्धा व संस्थेच्या क्रीडा स्पर्धा किंवा जिल्हा व राज्यस्तरी2य स्पर्धा झाल्यास त्यांचे आयोजन या क्रीडा संकुलावर करण्यात येईल तसेच राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र प्रशासनाने परवानगी दिलेली नसताना सुद्धा या ठिकाणी गरबा दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पदाधिकारी म्हणाले. आई तुळजाई भवानी मित्र मंडळातर्फे तालुका क्रीडांगण हे गरबा रास खेळण्यासाठी मागणी करण्यात आली मात्र क्रीडांगण उपलब्ध करून देता येणार नाही,असे तालुका क्रीडा अधिकारी यांनी 19 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मंडळाच्या अध्यक्षाला लेखी पत्राद्वारे कळवल्याचेही पदाधिकारी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !