भुसावळातील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळ पोलीस प्रथम अवॉर्ड विजेता
Shivmudra Pratishthan Ganesh Mandal Police First Award Winner in Bhusawal भुसावळ (05 ऑक्टोबर 2024) : गणेशोत्सवात उत्कृष्ठ आरास करणार्या, शिस्तबंध्द मिरवणूक, पोलिसांच्या सूचनांचे पालन करणार्या गणेश मंहळांना पोलीस अवॉर्ड देण्यात आले. यात पहिला नंबर शहरातील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळाने पटकाविला. टाळ्याच्या गजरात डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते या मंडळाला पारीतोषिक देण्यात आले. संतोषी माता हॉलमध्ये पोलिस गणेशोत्सव अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवदुर्गा उत्सव-2024 निमित्त शांतता समिती, महिला दक्षता समिती, वाद्य चालक-मालक असो., नवदुर्गा मंडळ पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक उध्दव डमाळे, तालुका निरीक्षक महेश गायकवाड, नशिराबाद येथील सहा.पोलीस निरीक्षक मनोरे, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक उमेश महाले यांच्यासह गटविकास अधिकारी सचिन पानझडे, पालिकेतील वैभव पवार, गणेश भट, वीज कंपनी, बीएसएनएलसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
गणेशोत्सव-2024 अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दल, भुसावळ उपविभागातर्फे आदर्श व विधायक गणेशोत्सवांची संकल्पना साकार होण्यासाठी गणराया अवॉर्ड स्पर्धेचे आयोजन केले होते.

गणराया अवॉर्डसाठी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी राधेश्याम लाहोटी यांच्या अध्यक्षेतेखाली शिक्षण, व्यापार, समाजसेवा इतर विविध क्षेत्रातील गणराया अवॉर्ड स्पर्धा परीक्षण-2024 ची स्थापना करीत समितीने बाजारपेठ, शहर पोलीस हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्यात.
नशिराबाद येथील तीन श्री गणेश मंडळ अशांनी जळगाव पोलीस दलाचे आवाहनास चांगला प्रतिसाद देत आदर्श व विधायक गणेशोत्सव साजरा केल्याने त्यांनाही पारीतोषीक देण्यात आले. नवदुर्गा-2024 अनुषंगाने स्थापन करणार्या नवदुर्गा मंडळ यांच्या विविध समस्या समजून घेत त्यांना उपस्थित पालीका, वीज कंपनी, बीएसएनएल विभाग, बसस्थानक अशा विभाग प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. दुर्गोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन डीवायएसपी पिंगळे यांनी केले.
यांना मिळाले बक्षीस
आगमन-स्थापना-विसर्जन दरम्यान भेटी देऊन त्यांनी सादर केलेल्या परीक्षण अहवालानुसार शहरातील शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळ यास प्रथम, जय गणेश फाऊंडेशन यास व्दितीय, लेवा प्रतिष्ठान गणेश मंडळ, वांजोळा रोड, तृतीय, जय लेवा गणेश मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड यास उत्तेजनार्थ-1 व विश्वज्योती गणेश मंडळ मारवाडी गल्ली यास उत्तेजनार्थ-2 असे पारीतोषीकांचे व सर्व गणराया अवॉर्ड स्पर्धा परीक्षण-2024 पदाधिकारी यांना प्रोत्साहनार्थ त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीसाठी प्रशस्ती प्रत्रक दिले.
