भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात कै.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती आंतरवर्गीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण
भुसावळ (05 ऑक्टोबर 2024) : शहरातील के. नारखेडे विद्यालयात शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरवर्गीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेचे ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी झाले. प्रमुख अतिथी डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य डॉ.अनघा पाटील होत्या. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी केले. प्रमोद नेमाडे यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे व डॉ.अनघा पाटील यांचा सत्कार प्रमोद नेमाडे यांनी केला. संस्थेचे सदस्य विकास पाचपांडे यांचा उद्योग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांच्यातर्फे कार्यक्रमाध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी तर के. एन.सी.टी.आय संस्थेतर्फे संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील यांनी तर संस्थेतर्फे पी.बी.तळेले यांनी तसेच विद्यालयातर्फे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी सत्कार केला.
पारितोषिक वितरणात सर्वप्रथम बालवैज्ञानिक स्पर्धा त्यानंतर आय.टी.सॉफ्ट फ्युजन व इलेक्टस् व्हिजन व निबंध स्पर्धांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथींचा परिचय नेहा पाटील तर सर्व बक्षीस यादी वाचन सोनाली राणे यांनी व सूत्रसंचालन एच.एल.जंगले यांनी केले. उपमुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एस.एम.चिपळोणकर, एस.डी.वासकर, एस.पी. पाठक, एम.व्ही.गरुडे, एस.पी.महाजन यांनी परिश्रम घेतले.

