अहमदाबाद-बरौनी दरम्यान उत्सव विशेष गाडी धावणार


भुसावळ (05 ऑक्टोबर 2024) : आगामी दिवाळी आणि छठपूजा लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अहमदाबाद ते बरौनी दरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक 09413/09414 अहमदाबाद-बरौनी-अहमदाबाद स्पेशलच्या 12 फेर्‍या होतील.

असे आहे गाडीचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 09413 अहमदाबाद-बरौनी स्पेशल 8 ऑक्टोबर 2024 ते 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रत्येक मंगळवारी अहमदाबाद येथून 4.35 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी चार वाजता बरौनी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 09414 बरौनी-अहमदाबाद स्पेशल 10 ऑक्टोबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत दर गुरुवारी बरौनीहून सहा वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 11.15 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. या गाडीला आनंद, वडोदरा, सुरत, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, सोनपूर, पाटलीपुत्र (पाटलीपुत्र) मार्गे) आणि हाजीपूर स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकूलित-द्वितीय, 8 वातानुकूलित-तृतीय, 8 शयनयान, 2 अनारक्षित डबे, 1 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !