भुसावळातील दोन तरुणांना गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूसांसह पकडले

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : शस्त्र तस्करी ऐरणीवर


Two youths from Bhusawal were caught with village knives and two live cartridges भुसावळ (06 ऑक्टोबर 2024) : भुसावळातील दोन तरुणांकडून दोन जिवंत काडतूस व दोन गावठी पिस्टल बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेचार वाजता वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगर फाट्याजवळ करण्यात आली.मुकेश मोहन अटवाल (20, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) व यश किरण बोयत (22, रा.अंजली हॉस्पीटलजवळ, तनारिका हॉटेल, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, हवालदार महेश चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल अमर आढाळे, कॉन्स्टेबल जावेद शहा हकीम शहा, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !