गॅस कटरचा भडका होवून दीपनगरात दोन कामगार भाजले
Two workers were burnt in Deepnagar after a gas cutter burst into flames भुसावळ (07 ऑक्टोबर 2024) : भेल कंपनीच्या एका सबकंत्राटदार कंपनीकडे रोजंदारी तत्वाने काम करणारे दोन मजूर गॅस मशीनने कटींग काम करताना भडका झाल्याने भाजले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. महानिर्मितीने काम दिलेल्या या दोघांना भुसावळातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही मजूर 10 ते 15 टक्के भाजयाची माहिती मुख्य अभियंता शशांक चव्हाण यांनी दिली.
सुरक्षेच्या नियमांना हरताळ
दीपक बाविस्कर व बिहारमधील अमित कुमार अशी भाजलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. दोन्ही कामगार हे ज्या खासगी कंपनीत काम करतात तेथे सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत, अशी माहिती कामगारांनी दिली. भेल कंपनीच्या अख्यतारीत येत असलेल्या कंपनीत झाल्याने या प्रकाराची चौकशी करुन कामगारांना योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे सूचित केले करण्यात येईल, असे मुख्य अभियंता चव्हाण यांनी सांगितले. दीपनगर प्रशासनाकडून यापूर्वीही अनेकवेळा सुरक्षा बाळगली जात नसल्याने अपघात झाले आहेत.

