मनवेलच्या 59 वर्षीय महिलेचा 24 तासात पोलिसांनी लावला शोध


यावल (07 ऑक्टोबर 2024) :   यावल तालुक्यातील मनवेल या गावातून एका 59 वर्षीय महिलेला देव-दर्शनासाठी घेऊन जात असल्याचे सांगून जळगाव येथील एका महिलेने फुस लावून पळवून नेले होते. 2 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता या महिलेला जळगावची महिला घेऊन गेली होती. शनिवार, 5 ऑक्टोबर रोजी यावल पोलिसात फुस लावुन पळवुन नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी जलद गतीने तपास चक्र फिरवत 24 तासाच्या आत महिलेचा शोध लावुन तिच्या कुटुंबास सोपवले.

त्या अज्ञात महिलेचा कसून शोध
मनवेल गावातील रहिवासी निर्मलाबाई हरी कोळी (59) यांना 2 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता ज्योती अशोक साळुंखे (जैनाबाद, बालाजी मंदिराजवळ, जळगाव) या देव-दर्शनासाठी घेऊन जात असल्याचे सांगून घेऊन गेल्या होत्या मात्र तेव्हापासून ही महिला घरी परतलीच नव्हती. महिलेचा शोध घेऊन ही महिला कुठेचं मिळाली नसल्याने यावल पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या मुलाने ज्योती साळुंखे यांच्याविरुद्ध फुस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करतांना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार अर्जुन सोनवणे, मोहसीन खान यांनी जलद गतीने तपासचक्र फिरवले व महिलेला मनुर, ता.बोदवड येथुन ताब्यात घेत कुटुंबास सोपवले. संशयीत महिलेचा शोध पोलीस घेत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !