क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेत भुसावळातील भोळे महाविद्यालयाचा संघ तृतीय
भुसावळ (07 ऑक्टोबर 2024) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा पाल, ता.रावेर येथे झाल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या क्रॉस कंट्री पुरुष संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
या स्पर्धेत 10 किलोमीटर धावण्याचे अंतर पाल-गारखेडा व परत पाल असे पूर्ण करून अर्जुन बोयत, उदय पाटील, आशिष वाघ, अजय वानखेडे, पूर्वेश सोनवणे, तुषार नरवाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

