भुसावळातील कोटेचियन्स अ‍ॅल्युम्नी असोसिएशन अध्यक्षपदी अनिता कोटेचा


भुसावळ (08 ऑक्टोबर 2024) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या कोटेचियन्स अ‍ॅल्युम्नी असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 6 रोजी झाली. सर्वसाधारण सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारीणी अध्यक्षपदी अनिता मोतीलाल कोटेचा, सचिवपदी प्रा.डॉ.ममताबेन चंद्रकांत पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली. कोटेच्या अ‍ॅल्युम्नीच्या उपाध्यक्षपदी प्रा.स्वाती शंकर शेळके, कोषाध्यक्षपदी राजश्री किशोर भालेराव तर संचालक सदस्यपदी मनीषा मावळकर, मोनाली श्रीकांत नाईक, भावना प्रकाश गवळी यांची निवड करण्यात आली. प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर यांनी नवीन कार्यकारिणीचे स्वागत केले.

निवडणुकीदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.दीपाली पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी प्रा.डॉ.राजकुवर गजरे व डॉ.जे.व्ही.धनवीज यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंदांतर्फे अभिनंदन करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !