दीपनगर उड्डाणपुलावर भरधाव ट्रक धडकल्या : चालकासह दोघे जखमी


Rushing trucks hit Deepnagar flyover : Two injured including driver भुसावळ (09 ऑक्टोबर 2024) : दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रक चालकाविरोधात गुन्हा
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील रेल्वे उड्डाणपुलावर वरणगावकडून भुसावळकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.46 एफ.18) व भुसावळकडून मलकापूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक (जी.जे.19 वाय.5234) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ट्रकमधील मधुकर भिकाजी वानखेडे (खामगाव, जि.बुलढाणा) गंभीर जखमी झाला तर  चालक गजानन नरहरी सरोदे (47, नांदुरा, जि.बुलढाणा) हे किरकोळ जखमी झाले. दोघांवर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी ट्रकचालक गजानन सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक (जी.जे.19 वाय.5234) वरील चालक अनिल पाल (रा.उत्तर प्रदेश)  विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !