शेतकर्‍यांना ठिंबक सिंचन योजनेचे अनुदान द्या : रावेरात महाविकास आघाडीने तहसीलदारांना निवेदन


Give subsidy to farmers for Thimbak Irrigation Scheme: Raveraat Mahavikas Aghadi to Tehsildars रावेर (09 ऑक्टोबर 2024) : शेतकर्‍यांच्या ठिंबक व तुषार सिंचन योजनेमधील थकीत अनुदान शासनाने त्वरीत अदा करावे, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी व ड्रीप डिलर असोसिएशनतर्फे निवासी नायब संजय तायडे तहसीलदार यांना देण्यात आले. आमदार शिरीष चौधरी, जिल्हा ड्रीप डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या ठिंबक व तुषार सिंचन योजनेमधील थकीत अनुदान अदा न केल्यामुळे काँग्रेस व ड्रीप डिलर संघटनेतर्फे जोरदार निदर्शने करून शासन विरोधी घोषणा देण्यात आल्या.

188 कोटी रुपये थकीत
निवासी नायब तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, 2022-23 व 2023-24 वर्षात शेतकर्‍यांनी शेतात ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच बसवले होते. अल्पभुधारक शेतकर्‍यांना 80 टक्के व बहुभुधारक शेतकर्‍यांना 75 टक्के अनुदान राज्य व केंद्र शासनाने निर्धारीत केले आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील तब्बल 32 हजार 402 शेतकर्‍यांचे अंदाजे 188 कोटी रुपये बाकी आहेत. राज्यातील शेतकर्‍यांचे 900 कोटी रूपये अनुदान येणे बाकी आहे व काही प्रस्तावाची तपासणी झाली तर काही तपासणी बाकी आहे. असे प्रस्ताव सुमारे पाच हजार असून त्याची रक्कम मिळून जळगांव जिल्ह्याला 210 कोटीची आवश्यकता आहे. त्यात रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांचे ठिबक सिंचनाचे प्रलंबित प्रस्तावांची संख्या ही तीन हजार 102 असून देयक बाकी रक्कम 20.36 कोटींवर आहे. शेतकर्‍यांच्या ठिबक व तुषार सिंचनाचे थकीत अनुदान शासनाने त्वरीत द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार शिरीष चौधरी, ड्रीप डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, संचालक डॉ.राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, राजू सवर्णे, सुनील कोंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष अविनाश पाटील, अ‍ॅड.योगेश गजरे, भुपेंद्र जाधव, संतोष पाटील, रामदास लहासे, गुलाब पाटील, योगीता वानखेडे, प्रदीप भालेराव, प्रणव पाटील, रोहन महाजन, सावन मेढे, उमेश गाढे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) पदाधिकारी कार्यकर्ते व ड्रीप असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्वरित अनुदानासाठी आंदोलन
शेतकर्‍यांच्या ठिबक व तुषार सिंचनाचे दोन वर्षाचे अनुदान शासनाने रखडून ठेवल्याने शेतकर्‍यांची कुचंबना होत आहे. शासनाला जाग यावी शेतकर्‍यांच्या हक्काचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !