रावेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव वैद्य नामकरण


रावेर (09 ऑक्टोबर 2024) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव वैद्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर, असे करण्यात आले आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील 143 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले. या संस्थांना आता नवी ओळख मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 12 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे.

वैद्य कुटुंबाने व्यक्त केला आनंद
कै.गोविंदराव भाऊराव वैद्य हे रावेरचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. रावेर शहर आणि परिसरात स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे त्यांनीच पेरली. 1936 आणि 1942 असे दोन वेळा त्यांनी अनुक्रमे 9 महिने आणि सहा महिने सश्रम तुरुंगवासाची शिक्षा जळगाव, धुळे आणि येरवडा तुरुंगात भोगली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नंतरच्या काळात शहर आणि परिसरात स्वातंत्र्याचे आंदोलन अधिक जोमाने लढले गेले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना केंद्र शासनाने ताम्रपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. 2 ऑगस्ट 1980 मध्ये त्यांचे निधन झाले. रावेर पालिकेने त्यांच्या कार्याचा आदर म्हणून रावेर शहरातील प्रमुख रस्त्याला स्वातंत्र्यसैनिक कै गोविंदराव भाऊराव वैद्य मार्ग असे नाव दिले आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल वैद्य कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !