भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रामलीला नाटीका उत्साहात


भुसावळ (11 ऑक्टोबर 2024) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवार, 11 रोजी दसर्‍यानिमित्त रामलीला नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी रामलीला नाटिका सादर केली. रामायणात दाखवल्याप्रमाणे राम, लक्ष्मण, सीता व हनुमानजी तसेच रावण यांच्यावर हुबेहूब नाटीका सादर करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
नाटीकेदरम्यान शाळेच्या प्रिन्सीपल निना कटलर यांनी रावण दहन करीत विद्यार्थ्यांना रामायणावर मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, शिक्षिका प्रतिभा काकडे, अपर्णा इंगळे, नितीन अडकमोल, प्रीती देशपांडे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या नाटिकेला शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !