भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘पदम’ नियतकालिकाचे प्रकाशन
भुसावळ (11 ऑक्टोबर 2024) : शहरातील श्रीमती पदमबाई कपूरचंद कोटेचा महिला महाविद्यालयात 9 रोजी ‘पदम’ या नियतकालिकचे प्रकाशन श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य शिरीष नाहाटा यांच्याहस्ते करण्यात आले.
लेखन प्रवृत्ती वाढावी हा उद्देश
विद्यार्थिनींमधील लेखन प्रवृत्ती वाढावी तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ‘पदम’ नियतकालिक प्रकाशित केले जाते. नियतकालिकात महाविद्यालयात वर्षभर विविध समित्यांमार्फत व विभागामार्फत राबवण्यात येणार्या उपक्रमांची माहिती असते. प्रकाशनावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल, उपप्रचार्या डॉ.जान्हवी तळेगावकर, आयक्यूसी कॉर्डीनेटर डॉ.जे.व्ही.धनवीज, डॉ.एच.पी.नारखेडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.अर्चना झिंगरन, प्रा.निलेश गुरुचल व प्रा.गिरीष सरोदे उपस्थित होते.

