धुळे पोलिस दलाच्या ताफ्यात ‘मोगली’ दाखल


धुळे : धुळे पोलिस दलाच्या ताफ्यात डॉबरमन जातीचे ‘मोगली’ श्‍वान दाखल झाले आहे. पुणे येथून दाखल झालेल्या या श्‍वानास प्रशिक्षण दिल्यानंतर गुन्हे शोधासाठी त्याची मदत होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या श्‍वानाच्या देखभाल व प्रशिक्षणासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर रायमल यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक कैलास परदेशी यांची हॅण्डलर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हा श्‍वान कर्तव्यासाठी तयार होणार आहे. दरम्यान, धुळे पोलिस दलात विरू व जॅक हे गुन्हे शोधक तसेच मॅक्स व सॅम अमली व स्फोटक पदार्थ शोधक श्‍वान दाखल आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !