महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंना जनतेचा प्रचंड प्रतिसाद : विजयाचा ठाम विश्वास


यावल (8 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील चितोडा, डोंगरकठोरा, सांगवी, बोरखेडा, हिंगोणा, न्हावी, मारुळ, आणि बोरखेडा या गावांमध्ये दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवाद दौर्‍यात नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद, तसेच मिळणार्‍या प्रेमाच्या वर्षावामुळे अमोल जावळेंना आगामी निवडणुकीत विजयाचा ठाम विश्वास आहे.

विजयाचा अमोल जावळे यांनी व्यक्त केला विश्वास
अमोल जावळे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गावागावातून आलेल्या नागरिकांनी, युवकांनी, ज्येष्ठांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमोल जावळेंना पाठिंबा दिला व मतदानाच्या माध्यमातून महायुतीला विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यांचा प्रचार दौर्‍यात सहभाग
दौर्‍यात हिरालाल चौधरी, शरद महाजन, नितीन चौधरी, नरेंद्र नारखेडे, बन्सीलाल गुजर, हर्षल पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, उमेश बेंडाळे, सविता भालेराव, राकेश फेगडे, यशवंत तळेले, प्रवीण वारके, जयश्री चौधरी, उमेश पाटील, किशोर कोलते, पंकज चौधरी, अतुल भालेराव, योगराज बर्‍हाटे यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यांनी या दौर्‍यात जावळेंना भक्कम विजयाची खात्री दिली.


कॉपी करू नका.