महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची 16 रोजी रावेरात जाहीर सभा
रावेर (14 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची जाहीर सभा शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी चार वाजता रावेरातील छोरीया मार्केट येथे आयोजित करण्यात आली आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आले आहे.