भुसावळातील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्रता प्रकरण : 21 ऑगस्टला होणार सुनावणी
Bhusawal Mayor Gayatri Bhangale-Gaur Caste Certificate Case: Bombay High Court Hearing Adjourned to August 21 भुसावळ (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : जिल्हा अनुसूचित जाती पडताळणी समितीने भुसावळातील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. 23 एप्रिल रोजी दिलेल्या या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत तसेच भुसावळातील रजनी सावकारे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत गायत्री भंगाळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवार, 28 रोजीच्या कामकाजानंतर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती मात्र न्यायालयाने मंगळवार, 11 रोजी पुढील सुनावणीसाठी 21 ऑगस्टची तारीख दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
निकालाकडे शहराचे लागले लक्ष
जळगाव जिल्हा अनुसूचित जाती पडताळणी समितीने गायत्री भंगाळे-गौर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. गत सुनावणीमध्ये प्रतिवादींचे वकिल न्यायालयात हजर होते. न्यायालयाने त्यावेळी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी म्हणजे 11 ऑगस्ट रोजीची तारीख दिल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष लागले होते मात्र मंगळवारी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी शुक्रवार, 21 ऑगस्टची तारखी दिल्याने आता निकालाकडे शहराचे लक्ष लागले आहे.


