आमदार संजूभाऊ चौथ्यांदा विजयी होणार ! : भुसावळातील प्रभाग क्रमांक सातमधील लाडक्या बहिणींचा सूर


भुसावळ (15 नोव्हेंबर 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या असून महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपयांची योजना सुरू केली आहे. दरमहा या योजनांचा लाभ मिळत असल्याने आम्ही समाधानी आहोत शिवाय आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून स्थानिक नगरसेवक व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे व माजी नगरसेविका सौ.अनिता सपकाळे यांच्या माध्यमातून प्रभागाचा चौफेर विकास झाल्याने आमदार संजय सावकारे सलग चौथ्यांदा मोठ्या मतांनी निवडून येतील, असा आशावाद प्रभाग सातमधील महिलांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला. शुक्रवार, 15 रोजी सकाळी 10 वाजता प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपातर्फे जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली.


आमदार म्हणाले ; स्वागताने भारावलो
भुसावळातील प्रभाग क्रमांक सातमध्ये सकाळी 10 वाजता अष्टविनायक कॉलनीपासून महायुतीच्या प्रचार रॅलीला सुरूवात झाली. श्रीनगर, भोई नगर, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, स्वरूप कॉलनी, लोणारी हॉल परिसरात पदाधिकार्‍यांनी ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढली. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर आमदारांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले तर सुवासिनींनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. आमदार यावेळी म्हणाले की, शहरातील विविध प्रभागांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. प्रभाग सातमध्ये झालेल्या स्वागताने आपण भारावले असून जनतेचा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित होईल, असा आशावाद त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना यावेळी व्यक्त केला.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
आमदार संजय सावकारे, सौ.रजनी सावकारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेविका प्रीती मुकेश पाटील, प्रतिभा वसंत पाटील, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, गिरीश महाजन, अजय नागराणी, प्रा.सीमा धीरज पाटील, विशाल जंगले, प्रा.धीरज पाटील, अमोल पाटील, संतोष (दाढी) चौधरी, वासुभाऊ बोंडे, माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे, गुणवंत बोरोले, गोकुळ बाविस्कर, निरज तिवारी, देवेंद्र पाटील, रमाशंकर दुबे, अजय भोळे, अनिता आंबेकर यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपाचे सर्व माजी नगरसेवक आदींची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !