भुसावळातील माजी नगरसेविका वैशाली मराठे-पाटील यांचा भाजपात प्रवेश

आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार


भुसावळ (16 नोव्हेंबर 2024) : भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती ललित मराठे यांनी शनिवारी यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार संजयभाऊ सावकारे व पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मराठे-पाटील दाम्पत्याने दिली.

प्रभागासह शहरात भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करणार
मराठे-पाटील दाम्पत्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत आमदार सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्यात येतील व भाजपाच विजय निश्चित होईल, असा विश्वास यावेळी दाम्पत्याने व्यक्त केला.


यांची होती उपस्थिती
शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती व भुसावळ नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती ललित मराठे यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. यावेळी उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, पिंटू कोठारी, परीक्षीत बर्‍हाटे, अजय भोळे, परिक्षीत बर्‍हाटे, दिनेश नेमाडे, रमाशंकर दुबे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी यांची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !