भुसावळात उद्या आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ महायुतीची भव्य रॅली
मंत्री रक्षा खडसे यांची राहणार उपस्थिती : पदाधिकार्यांना उपस्थितीचे आवाहन
भुसावळ (17 नोव्हेंबर 2024) : भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष उपस्थितीत शहरातून सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भव्य महारॅलीचे काढण्यात येणार आहे. जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून प्रचार रॅलीला सुरूवात करण्यात येईल.
असे आहे रॅलीचा मार्ग
जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून सोमवारी सकाळी 10 वाजता रॅलीला सुरूवात होईल. अष्टभूजा देवी, ब्राह्मण संघ, डिस्को टॉवर, मरीमाता मंदिर, लक्ष्मी चौक, गांधी चौकी, अमर स्टोअर्स, लोखंडी पूल, वसंत टॉकीजमार्गे, तु.स.झोपे शाळा, जळगाव रोड, सरदार वल्लभभाई पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर तिचा समारोप होईल.

पदाधिकार्यांना उपस्थितीचे आवाहन
महारॅलीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.




