महायुती सरकार स्थापन करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांना निवडून द्या : मंत्री रक्षाताई खडसे
वरणगाव (17 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभेतील महायुतीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ वरणगावात भव्य जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित होत्या. आमदार संजय सावकारे यांनी विविध विकासकामे केली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी आमदार सावकारे यांना पुन्हा संधी देवून मोठ्या मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वरणगावात जाहीर सभा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ विधानसभेसाठी महायुतीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ वरणगाव शहरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भव्य जाहीर सभा पार पडली.

यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार संज सावकारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मंत्री रक्षा खडसे यांनी केले. यावेळी महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




