रावेर विधानसभा निवडणूक : वारसा पिढ्यांचा अन् पाढा समस्यांचा !

रावेर मतदारसंघात ‘विकास’ हरपला : निवडणुकीपुरता जनतेची आठवण


जळगाव (18 नोव्हेंबर 2024 ) : ‘वारसा…वारसा अन् केवळ वारसा’ या तीन अक्षरांच्या अवतीभवती घिरट्या घालून मतदारसंघातील नागरिकांना ‘उल्लू’ बनवून आपला ‘उल्लू’ साध्य करण्याचे काम एका लोकप्रतिनिधीने चालविला असून रावेर विधानसभा मतदारसंघातून ‘विकास’ हद्दपार झाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात आदिवासींचे कैवारी असल्याचे भासविले जात असले तरी त्यात तथ्य नाही. आजही बहुतांश आदिवासी पाडे, वस्त्या समस्यांनी त्रस्त आहेत. आदिवासी समाजाकडे कुणाचेच लक्ष नाही हे त्या मतदारसंघात फेरफटका मारल्यास सहज लक्षात येते.

विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून रावेर विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना रंगत आहे. विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी पुत्र धनंजय यांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले असून ते आपली घराणेशाही परंपरा पुन्हा पुढे करीत आहे. भारतीय जनता पक्षाने देखील ‘मुंबईवाले’ अमोल जावळे यांना उतरविले असली तरी त्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवलेले प्रहार जनशक्तीचे उमेदवार अनिल चौधरी यांनी मात्र प्रचारात आघाडी घेत दोघा राष्ट्रीय पक्षांना चांगलाच घाम फोडला आहे.


घराणेशाही लादण्याचा प्रयत्न….
स्वातंत्र्य सैनिक धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी, शिरीष चौधरी या तीन पिढ्या मतदारांनी स्विकारल्यानंतर आता धनंजय यांच्या रुपाने चौथी पिढी राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न होत असला तरी मतदार त्याला साथ देतील कि नाही हा प्रश्नचिन्ह आहे. मधुकरराव चौधरी यांच्या नंतर शिरीष चौधरी यांनी केवळ ‘आमदारकी’चा डोलारा उभा केला असला तरी त्यांच्या हातून विकासाची मुहूर्तमेढ मात्र झाली नाही. गटारी, रस्ते, अंगणवाड्यांची निर्मिती यापलिकडे त्यांनी कुठलेही ठोस काम केले नाही. केवळ आपल्या शैक्षणिक संस्थांना ‘संरक्षण’ मिळावे यासाठीच ते सातत्याने धडपडत राहिले. गेली अडीच वर्षे महायुतीचे सरकार असतांनाही त्यांनी शेतकर्‍याच्या समस्यांबाबत साधे निवेदन देखील दिले नसल्याचे मतदार बोलू लागले आहे. आता निवडणुकीच्या काळात त्यांना ‘माय-बाप’ शेतकरी आठवत आहेत.

‘मुंबईवाला’ विरुद्ध भूमीपुत्र..
भारतीय जनता पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून केवळ वडीलांची पुण्याई म्हणून ‘मुंबईवाला’ अशी ओळखअसलेले अमोल जावळे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात प्रचंड नाराजी आहे. अमोल जावळे हे मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहत असून त्यांची मतदारसंघाशी नाळ जुळलेली नाही. मतदारसंघातील नागरिकांना उद्या काही मदत लागली तर मुंबईच्या वार्‍या कराव्या लागू शकतात; हे देखील ध्यानात घेतले पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्षाने राष्ट्रीय पक्षांना जशास तसे उत्तर देत खरे भूमीपुत्र असलेले अनिल चौधरी यांना संधी दिली आहे. गेली पाच वर्षे ते या मतदारसंघातील नागरिकांसाठी अहोरात्र झटत आहेत. कुठलेही पद नसतांना त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केलेत. गरजूला मदतीचा हात देणे हा त्यांचा गुण अनेकांना भावत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने काँग्रेस व भाजपाची बिघाडी होत आहे. मतदारांना अनिल चौधरी यांच्या उमेदवारीमुळे संधी मिळाली असून त्या संधीचे ‘सोने’ करणे अपेक्षित आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !