पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणारा जळगावातील संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Jalgaon suspect who created terror by carrying a pistol caught by the Crime Branch जळगाव (24 नोव्हेंबर 2024) : गावठी पिस्टलसह मॅग्झीन घेवून दहशत निर्माण करणार्या संशयीत आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता अटक केली. आरोपीकडून 32 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी रात्री 11 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नमीर आसीफ खान (19, रा.काट्या फाईल, जळगाव) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात संशयित आरोपी नमीर आसीफ खान हा अवैधपणे गावठी पिस्तूल व मॅगझीन घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.

यांनी केली कारवाई
पथकाने शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता कारवाई करत संशयित आरोपी नमीर आसीफ खान याला अटक करीत त्याच्या ताब्यातील 32 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी रात्री 11 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर आंभोरे, अकरम शेख, राहुल पाटील यांनी केली.
